या पुस्तकात शुनम्यो मसुनो या प्रख्यात बौद्ध संन्यासींनी कित्येक शतकांपूर्वींच्या ज्ञानाची (झेन ज्ञानप्रणालीच्या साराची) आधुनिक जीवनासाठी स्पष्ट, व्यावहारिक आणि सहजतेने अवलंबता येतील, अशा नियमांत मांडणी केली आहे. शंभर दिवसांकरिता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात. यातून आपल्या लक्षात येईल की, केवळ विलक्षण अनुभूतीचा शोध घेण्यात प्रसन्नता दडलेली नसून, आयुष्यातल्या छोट्या बदलांतूनदेखील तशीच अनुभूती येऊ शकते. त्या जोडीने आपल्याला आंतरिक शांती आणि स्थैर्य यांचाही अनुभव येऊ शकतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!