माझा विश्वास आहे, की बहुतांशी माणसे चांगली असतात. त्यांना काय करायचे हे निश्चितपणे माहिती असते. ते करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे असतात. एव्हढेच नाही तर ते अधिक चांगले कसे करायचे हेदेखील त्यांना माहिती असते. या दोन्हीही गोष्टी असूनदेखील मग प्रश्न पडतो, की लोक तसं का करीत नाहीत? कमतरता असते ती केवळ एका ठिणगीची. म्हणजे प्रेरणेची. मग ‘प्रेरणा’ म्हणजे काय? कृतीला किंवा जाणिवेला ज्याने प्रोत्साहन मिळते, त्याला ‘प्रेरणा’ म्हणतात. प्रेरणेसाठी आपल्यापुढे काही आदर्श असावे लागतात. ते आदर्श आपल्याला या पुस्तकात भेटतील