गोष्टीची पुस्तके आपल्याला नेहमीच आवडतात. छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह जर एकाच पुस्तकात मिळाला तर आपल्याला आणखीनच आवडते, त्यातूनही त्या पुस्तकात जर प्राण्यांच्या गोष्टी असतील तर मग काय विचारता! तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ह्या पुस्तकात मी छोट्या छोट्या चौदा गोष्टी लिहिल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत, काही प्राण्यांच्या गोष्टी आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ह्या गोष्टींतून जे मोठे मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहिलेच आहेत, पण हे धडे अमलात आणले तर आयुष्यावर दूरगामी परिणाम काय होतील ते मी सांराशामध्ये लिहिले आहेत. माझे हे गोष्टीचे पुस्तक तुम्हाला निश्चित आवडेल.