'जीवनातले सत्य अन् मिथ्य, सौंदर्य अन् कुरूपता, शाश्वतता अन् क्षणभंगुरता, निष्ठा अन् द्रोह, प्रेम अन् वैर, विचार, विकार, वासना,कल्पना अन् भावना या साऱ्यांचे आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्याने अद्भुत रसायन बनवले आणि निर्माण केली एक विस्मयचकित करणारी प्रतिसृष्टी. जगभरातल्या अनेक प्रज्ञावंतांना, कलावंतांना, साहित्यिकांना, रंगकर्मींना, समीक्षकांना अन् विचक्षक वाचक-प्रेक्षकांना चार शतकांहून अधिक काळ त्याने भारून टाकले आहे आणि तरीही त्याची मोहिनी तसूभरही कमी झालेली नाही. अशा अलौकिक प्रतिभावंताच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देणारा संग्राह्य ठेवा -
Thanks for subscribing!
This email has been registered!