`व्हॉट वेंट राँग ?` हे व्यक्तिगत अनुभवांचे जसेच्या तसे प्रामाणिकपणे मांडलेले अभिनव असे संकलन आहे. यातून अशा काही लोकांचे अनुभव व्यक्त झाले आहेत, ज्यांच्यापाशी केवळ भूतकाळात केलेल्या चुकांविषयीची जाणीव तेवढी शिल्लक उरलेली आहे. जीवनातील हे काही अनुभव, कटू सत्याचे यथार्थ, अंतर्बाह्य दर्शन घडवणारे असेच आहेत. वाचकांना ह्या अशा प्रकारच्या जीवनाची, अशा अनुभवांची कधी कल्पनासुद्धा करता येणं शक्य नाही. हे अनुभव वाचकांच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून, वाचकाला अंतर्यामी हादरवून सोडतील. या अशा प्रकारच्या चुका पुन्हा कधी घडू नयेत म्हणून समाजातील काही घटक आज अहोरात्र कामाला लागले आहेत. अनेक सामाजिक समस्यांना हात घालणारा, असंख्य प्रश्न उपस्थित करणारा हा एक दस्तऐवज आहे.