अनेक क्षेत्रांपैकी एक प्रचलित आणि आवडीचे क्षेत्र म्हणून खेळ या क्षेत्राकडे पाहिले जाते. सशक्त शरीरासाठी भोजनाइतकेच व्यायाम वा खेळाला महत्त्व आहे. मात्र खेळांचे काही नियम असतात. त्या नियमांनी खेळ खेळले गेले तर खेळाचे योग्य परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्याबरोबर खेळावर आपले प्रभुत्व कायमस्वरूपी टिकून राहते. या पुस्तकात वेगवेगळ्या खेळांचे नियम, इतिहासाच्या मनोरंजक बाबींसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. या पुस्तकात खेळांच्या नियमांच्या स्पष्टतेवर विशेष लक्ष दिले आहे. खेळांची क्रीडांगणे आणि त्यांच्या साधनसामग्रीची चित्रेही उपयोगी ठरतील. |