‘ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान, त्याहूनही मोठे असे
हे अज्ञान’ असं रॉय किणीकर आपल्या एका कवितेत म्हणतात. हे अज्ञानच माणसाला विज्ञानाकडे ओढून नेत असते. या अज्ञानातूनच कुतूहल निर्माण होत असते.
कुतूहल हे माणसाच्या जगण्याची ऊर्जा आहे. कुतूहल प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरं आपल्याला विज्ञानाकडे घेऊन जातात. माणसाला ज्ञात असलेल्यापेक्षा अज्ञात असं खूप काही आहे. त्या अज्ञाताचा शोध माणूस सतत घेत राहतो. त्यातूनच जगभरात विविध स्वरुपाचे अनेक वैज्ञानिक प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकीच विश्वाचा वेध घेणार्या जगातल्या दहा महत्त्वाच्या विज्ञान प्रकल्पांची ओळख हे पुस्तक आपल्याला करून देत.
विश्वाचा वेध घेणारे हे महत्त्वाचे दहा प्रकल्प कोणते? ते कोणाकडून हाती घेतले गेले आहेत? त्यांचा उद्देश काय? त्याचं स्वरुप काय? आणि त्यातून साध्य काय होणार?
अशा आपल्या मनातील प्रश्नांचा वेध या पुस्तकातून घेतला आहे. त्यामुळे विज्ञानाविषयी कुतूहल असणारे, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच विज्ञानाचे अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणी असेल.
Vishwavedh & Meena Kinikar
Thanks for subscribing!
This email has been registered!