महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली.
नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची,
समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची.
हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे.
प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून
विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली.
संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी-रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत
ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू.
पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात.
म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं.
पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच
विद्याताई आणि..
Thanks for subscribing!
This email has been registered!