विज्ञानविश्वातील
वेधक आणि वेचक
असे म्हटले जाते की, सध्या आपण विज्ञानयुगात वावरतोय. विज्ञान आणि त्यापासून विकसित झालेले तंत्रज्ञान यांनी अवघे मानवी जीवन व्यापून टाकले आहे.
पण आपल्या जीवनाचा ताबा घेणारे विज्ञान मुळात आहे तरी काय…? विज्ञानाकडून विविध शोधांची होणारी बरसात कितपत कल्याणकारी आणि कितपत त्रासदायक आहे…? अशा प्रश्नांची दखल घेणे आवश्यक वाटते.
आपण पुराणातील ऋषी-मुनी, इतिहासातील राजे-महाराजे आणि देशाचे भवितव्य बदलणारे राजकारणी अशा
व्यक्तिमत्त्वांची ओळख करून घेतो. त्याच न्यायाने चिकाटीने आणि सातत्याने संशोधन करून नवनवीन शोध लावणारे गणितज्ञ आणि वैज्ञानिक यांच्याबद्दलही सर्वांनी जाणून घेणं खरंतर आवश्यक आहे.
जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी वेळोवेळी विविध वैज्ञानिक प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. आपल्या वैज्ञानिक जाणिवा समृद्ध करणारे हे लेखन वाचकांना विज्ञानाच्या विविधरंगी रूपांचे दर्शन घडवते.