भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!