वेध रायगडाचा ही कल्पकथा नाही की कादंबरी नाही, तसेच ते स्थळ वर्णनदेखील नाही, तर ते आहे स्थळ दर्शन. लेखकाने गेल्या २४ वर्षांत आपल्या निरीक्षणात आलेल्या सर्व नोंदी या पुस्तकात इ.स.३११ ते इ.स. १९४७ पर्यंतच्या ठळक घडामोडी आणि त्याचे तपशीलवार विवेचन ज्ञात रायगडापेक्षा अज्ञात रायगड तसा खूप मोठा आहे. बुध्दिकालीन, सातवाहनकालीन संदर्भापासून ते स्वातंत्र्याची पहाट येथेपर्यंतचा इतिहास येथे देण्याचा प्रयास केलेला आहे. जी स्थळे सहसा सामान्य पर्यटकांच्या दृष्टीस पडणार नाहीत ती स्थळे लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेध रायगडाचा ही रंजक कथा नसून तो एक जिवंत इतिहास आहे. या कथेचा नायक आहे प्रत्यक्ष किल्ले रायगड.
Thanks for subscribing!
This email has been registered!