वाढत्या वयाबरोबर प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो, त्यामुळे अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळेही वातदोष आणि वातविकार वाढतात. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका. साधारणतः सर्व प्रकारच्या परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.