मेनका प्रकाशनाचा बेस्ट सेलर. सुप्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. मालती कारवारकर यांनी लिहिलेले पुस्तक निरोगी मुलाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी सर्वांगीण मार्गदर्शक ठरते. गरोदरपणात स्त्रीच्या पौष्टिक गरजा वाढतात. त्यामुळे प्रत्येक गर्भधारणेपूर्वी आहार आणि पोषण तपासणे आणि त्यात सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.