‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली वाचकांना भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच चित्रित केल्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यफूर्ण रीतीनं मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बलाढ्य, हेकेखोर अमेरिकेची काळी बाजू उजेडात आणून, दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी माणूसपणा टाचेखाली कसा चिरडला जातो, याचं विदारक वर्णन म्हणजे ’उद्ध्वस्त.’