मनःशांती, चिंतामुक्त जीवन, निरोगी शरीर, चांगलं उत्पन्न आणि त्याचबरोबर चांगले नातेसंबंध या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी मनाला कशाप्रकारे प्रशिक्षण द्यायचं हे या पुस्तकात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. या पुस्तकात दिलेल्या साध्या सोप्या स्वयंसूचनांचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचं आनंदी आणि असामान्य जीवन घडवू शकाल. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय विचार मनाला द्यायला हवेत, ते हे पुस्तक तुम्हाला सांगतं. या पुस्तकात अनेक प्रकारच्या स्वयंसूचना सांगितलेल्या आहेत ज्या दैनंदिन जीवनात तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. उदा. आजारातून बरं होण्याकरता, दिवसाची सुरुवात करताना, अडचणींचा सामना करताना, काम करताना, समृद्धीकरता, गाडी चालवताना... अगदी जीवनाच्या अंतिम क्षणाची तयारी करताना काय स्वयंसूचना द्याव्यात इथपर्यंत.