संपूर्ण माहितीपूर्ण व अत्यंत सुस्पष्ट विवेचन करणारे हे पुस्तक, सर्व वयोगटांतील मुलांशी वागताना, प्रत्येक पालकाला दैनंदिन व्यवहार्य जीवनात अत्यंत उपयोगी पडेल. लहान बाळापासून ते किशोर - वयातील मोठ्या मुलांशी कसे वागावे. याबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, ‘पालकांची गीता’ ठरली नाही, तरच नवल. एकदा वाचायला घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय हे पुस्तक खाली ठेवणे हे कोणाही पालकाला जवळजवळ अशक्यच. मुलांचे संगोपन ही गोष्ट दैवावर सोडून चालणार नाही. फारच थोड्यांना ह्याबाबतचे उपजत ज्ञान असते. मुलांना जर योग्य तऱ्हेने वाढवून मोठे करायचे असेल, तर प्रत्येक पालकाला ह्याबाबतीत खूप काही शिकण्यासारखे आहे, अभ्यासण्यासारखे आहे, आणि त्यासाठीच हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. उपयुक्त ठरणार आहे. आई-वडिलांची मानसशास्त्रातील उच्च पदवी मिळवलेली असो विंÂवा आयुष्यात एकही परीक्षा दिलेली नसो, सर्वच पालकांना हे पुस्तक ‘लाख मोलाचा सल्ला’ देणारा मार्गदर्शक वाटेल.