कोणत्याही क्षेत्रात यश सहज साध्य गोष्ट आहे.
त्यासाठी हवी तुमची जिद्द, जबर महत्त्वाकांक्षा, मेहनतीची
इच्छा आणि स्वप्न पाहण्याची दूरदृष्टी.
आपले भविष्य आपणच घडवीत असतो.
वर्तमानाच्या प्रयत्नातून, आपल्या भविष्याचे शिल्पकार
व्हायचे असेल, तर या पुस्तकातील टिप्स तुम्हाला नक्की
मदत करतील.
या पुस्तकाच्या वाचनातून यशाचा व्यावहारिक आराखडा
लक्षात येईल, तुमची निर्णयशक्ती वाढेल.
जीवनात सर्व क्षेत्रात उत्कृष्ट हवे असेल, तर त्यासाठी हे
पुस्तक प्रेरणा देऊ शकेल.
तुमचे यश तुम्हाला नेहमी खुणावत असते, त्याकडे
जिद्दीने चालत राहणे, आलेल्या प्रसंगांना आत्मविश्वासाने
सामोरे जाणे, तीस दिवसांत हा यशाकडे जाण्याचा
राजमार्ग आहे.