भारतीय औद्योगिक जगतातलं
एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे नारायण मूर्ती.
भारतातील आय.टी. उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देत
‘इन्फोसिस’च्या उभारणीचं काम त्यांनी केलं.
अतिशय बुद्धीमान असलेले मूर्ती केवळ
यशस्वी उद्योजक नाहीत तर औद्योगिक जगतात
विश्वासार्हता आणि पारदर्शीत्व राखत त्यांनी
नैतिकता रुजवली. कार्पोरेट क्षेत्रात
आपल्या बुद्धीच्या ताकदीवर पण नीतीमत्तेला पटतील
अशाच गोष्टी करून प्रगती साधायची
हा दृष्टीकोन मूर्तीनी आयुष्यभर बाळगला.
उत्कृष्ट दर्जाचा आग्रह ठेवत आपला उद्योग
जागतिक पातळीवर नेत वैभवशाली उद्योगाची
उभारणी करणार्या मूर्तींनी वैयक्तिक जगण्यातलं
साधेपण आजही जोपासलं आहे.
म्हणूनच नारायण मूर्ती ठरतात तुमचे-आमचे सुपरहिरो!
Thanks for subscribing!
This email has been registered!