तुम्ही सहज तरून जाल! एखादी गोष्ट गमावण्याचे दु:ख हे जरी अटळ असले तरी त्यापासून होणारे नुकसान मात्र आपण टाळू शकतो. तुम्ही तुमच्या भूतकाळातील वेदनांवर उपचार करू शकता आणि त्या अनुभवाकडे सकारात्मक नजरेने पाहून नवीन काही शिकू शकता. तुमचे आयुष्य अधिक वाईट होण्याऐवजी ते अधिक चांगले बनवू शकता. ‘मार्स अॅण्ड व्हीनस स्टार्तिंग ओव्हर’ हे पुस्तक प्रेमातून उद्भवणाया प्रसववेदनांबद्दल आहे. ही माझ्याकडून जगाला दिलेली भेट आहे आणि अठ्ठावीस वर्षे तुमच्यासारख्या लोकांची सेवा करण्याचे फलित आहे. मला अशी आशा आहे की, याचा तुम्हालाही नक्कीच उपयोग होईल आणि तुमच्या आत्म्याला या अंधाया प्रवासात त्याची मदत होईल. तुमच्या निराशेच्या अंधकारात हे पुस्तक एखाद्या मेणबत्तीप्रमाणे तुम्हाला प्रकाश देईल, तुमच्या मार्गात एखाद्या चांगल्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, तुमच्या एकाकीपणात फुंकर घालणाया समजूतदार मित्राप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला वाटेल. तुमच्या अतिशय वेदनामय अशा काळात हे पुस्तक तुमच्या जिवाभावाच्या मित्राप्रमाणे उपयोगी ठरेल. हे पुस्तक पुन्हापुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. इतरही पुष्कळ लोक या रस्त्यावरून गेले आहेत आणि त्यांचे ठीक चालले आहे. पुन्हा प्रेम करण्यासाठीच ते जिवंत राहिले आहेत आणि तुम्हीसुद्धा राहाल!