विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने
हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला.
सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या 'तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला.
एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला.
सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला.
एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले.
पण ही खुनांची मालिका आणि त्यामागील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे.
कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ?
एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी
तृतीय क्षेत्र...
Thanks for subscribing!
This email has been registered!