'विज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!