आर्थिक स्वातंत्र्य, श्रीमंती आणि मुक्त जीवनशैली
दर्शवणारा दिशा दर्शक मार्ग
जे.एल.कॉलिन्स
तुमचे अवघे जीवन बदलून टाकणारे पुस्तक मिळणे, खरोखरीच दुर्मिळ आहे. परंतु जे. एल. कॉलिन्सच्या समंजस आर्थिक नीतीमुळे मला पुढचा रस्ता अगदी स्पष्ट दिसायला लागला. पूर्वी मी आर्थिक विवंचनेत असायचो! पण माझी ती तडफड कॉलीन्सने खूपच कमी केली. तुम्ही जर तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल खरोखरीच गंभीर असाल, तर तुम्ही प्रस्तुतचे पुस्तक वाचून त्यावर कृतीशील चिंतन करण्याची मोठी गरज आहे.’
ब्रॅड बॅरेट, सीपीए
रिचर्ड सेव्हर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स माईल्स १०१
‘संपत्तीचा मार्ग अधिकाधिक सोप्पा आणि ताजातवाना करीत, एक अद्वितीय आर्थिक नीती कॉलिन्स आपल्याला प्रदान करतो. कॉलिन्स यांची छोटी छोटी सूत्रे ही सहज सोपी आणि आचरणात आणता येण्यासारखी आहेत. कॉलिन्स म्हणतो ः ‘पैसा अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो, हे जरी खरे असले तरी स्वातंत्र्यापेक्षा मौल्यवान असे काहीच नसते.’ तो पुढे असेही म्हणतो की, ‘कर्ज काढणे हे जळूसारखी कीड अंगाला लावून घेण्यासारखेच आहे. जी आपले रक्त शोषून आपल्याला कायमचे नष्ट करून टाकते.’ एकूणच, कॉलिन्सच्या युक्तीच्या चार गोष्टी आपल्याला अगदी समृद्ध आणि स्वतंत्र करुन सोडतात नक्की!’