ही प्रेरणादायी कथा आहे, बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध हेअर-स्टाइलिस्टची. दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. या पुस्तकात शिवाचा अद्भुत जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. यामुळे त्याने लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट आपल्या समोर येतात. आज शिवाज् हा ब्रँड असला, तरी त्यामागची कठोर तपश्चर्या या पुस्तकातून आपल्या समोर येते.
Thanks for subscribing!
This email has been registered!