स्टीव्ह जॉब्ज हा अशा महान अमेरिकन संशोधकांपैकी एक होता ज्यानं नेहमीच इतरांपेेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार केला. आपण हे जग बदलू शकू असा त्याला विश्वास होता आणि तसं करण्यासाठी आवश्यक असलेली असामान्य प्रतिभाही त्याच्यात होती.
– बराक ओबामा स्टीव्ह जॉब्ज हा थॉमस एडिसननंतरचा सर्वांत महान संशोधक होता.
– स्टीव्हन स्पीलबर्ग मी त्या निवडक भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांना स्टीव्हबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
– बिल गेट्स स्टीव्ह जॉब्ज हा कॉम्प्युटर युगाचा मायकल अँजेलो होता. त्यानं हे सिद्ध करून दाखविलं की, प्रतिभावान व्यक्तींसाठी महागडं आणि अभिजात शिक्षण हे आवश्यक असतंच असं नाही.
– नारायण मूर्ती जगानं एका द्रष्ट्या व्यक्तीला गमावलं आहे, तंत्रज्ञानजगतानं एक महारथी गमावला आहे तर मी माझा मित्र गमावला आहे. भावी पिढ्या स्टीव्ह जॉब्जनं केलेलं महान कार्य नेहमीच स्मरणात ठेवतील.
– मायकेल डेल स्टीव्ह जॉब्ज ही कित्येक शोध लावणारी आणि कमालीची प्रतिभा लाभलेली महान व्यक्ती होती. त्याला अतिशय कमी शब्दांत हे सांगण्याची कला अवगत होती की, आपल्यापैकी प्रत्येकानं नेमका कसा विचार करायला हवा.
– लॅरी पेज स्टीव्ह, माझा मार्गदर्शक आणि मित्र असल्याबद्दल धन्यवाद. तू जी उत्पादनं बनवलीस त्यांच्यात जगाला बदलून टाकण्याची क्षमता आहे. मला नेहमीच तुझी उणीव भासेल.
– मार्क झुकेरबर्ग स्टीव्ह जॉब्ज हा आपल्या पिढीतील एक महान सी.ई.ओ. (मुख्य कार्यकारी अधिकारी) होता. – रूपर्ट मर्डोक