भारतीय साहित्याच्या हजार वर्षांच्या इतिहास संत कबीर कवी म्हणून सर्वांना परिचित आहेत. कबीर जे काही सांगत त्याला अनुभवाचा आधार होता. म्हणूनच त्यांची वाणी मनाचा ठाव घेणारी आणि दोषांवर आघात करणारी होती. या पुस्तकात कबीरांच्या जीवन चरित्राबरोबर त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक तसेच प्रचलित घटनांबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच कबीरांचे तत्त्वज्ञान रसपूर्ण आणि सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. कबीरांच्या प्रसिद्ध आणि प्रचलित साखियांचा अर्थ इथे दिला आहे. कबीरांचे जीवनकार्य आणि त्यांची शिकवण सांगितली आहे. |