श्री. शंकरराव काळे म्हणजे काळ्या कसदार मातीतून उगवलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व! म्हणूनच मातीशी जोडल्या गेलेल्या सार्याच कष्टकर्यांबद्दल त्यांना आस्था आणि बांधीलकी. या कष्टकर्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा यासाठी त्यांच्या दारापर्यंत ज्ञानगंगा गेली पाहिजे याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांचा दुसरा श्वास म्हणजे सहकार. शिक्षण आणि सहकाराशिवाय कष्टकर्यांचा उद्धार नाही, याची खूणगाठ त्यांनी मनाशी पक्की बांधली आणि त्यासाठी त्यांनी समाजहितेशी, सकारात्मक राजकारण केले, सगळा परिसर बदलून टाकला. या राजकारणाचा दर्जाही वेगळा आहे जे सकारात्मक आहे, सृजनशील आहे, आणि सार्यांना पोटात घेणारे आहे. त्यांतूनच विरोधकांना सहकार्य करण्याची उदारता त्यांच्यात आली आणि आपल्या मर्यादांकडे व पराभवाकडेही खिलाडूपणे पाहण्याचे औदार्य त्यांच्यात आले आहे. अशा सगळ्या गुणांनी मंडित झालेले, स्वत:मधल्या माणूसपणाचा शोध घेणारे हे आत्मकथन; एखाद्या कसदार लेखकाने लिहिले असावे असे वाटते. जे अतिशय प्रांजळ, पारदर्शक, नितळ आणि वाचनीय झाले आहे. तसेच समकालीन महाराष्ट्राचे ते सामाजिक दस्तऐवजही झाले आहे.
सहकार, शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचले पाहिजे.
Thanks for subscribing!
This email has been registered!