ब्रिटन देशाचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षं राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे, या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच अभिमानाने फुलते. केवळ सात वर्षांमध्ये खासदार ते पंतप्रधान अशी मजल मारणार्या ऋषी सुनक यांनी ब्रिटिश राजकारणात आपलं भरभक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे, गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे... ब्रिटनचे पंतप्रधान पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. आपलं कर्तव्य हाच आपला धर्म आहे, हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत आणि दिवस-रात्र मेहनत करत आहेत. एक चित्तथरारक राजकीय प्रवास...