श्री. देवकिसन सारडा हे एक चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे असलेले कणखर व्यक्तिमत्व आहे. ते जेव्हा एखाद्या ठिकाणी असतात वा नुसते असत नाहीत, तर स्वत: सर्वाना जाणवण्याइतके असतात. वृतीत भाविकता आहे पण तिला लढाऊपणाची जोड आहे. त्यांच्या या गुणविशेषांचा मोठाच लाभ नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला झालेला आहे. अनेक संस्थांना आणि कार्यांना त्यांचा खंबीर आधार वाटतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!