अच्य्ुतचं ‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र जनमानसांत एक नवी लाट निर्माण करणारं ठरेल याची मला खात्री आहे. मानसशााावरच्या ‘मनात’ या पुस्तकानं मराठी पुस्तकजगतात एक मैलाचा दगड म्हणून ही गोष्ट सिद्ध केलीच आहे. मी नेहमीच अच्य्ुतच्या लिखाणानं, त्याच्या कुतूहलानं, वैविध्यपूर्ण विषयात असलेला त्याचा रस यानं आणि त्याच्या ज्ञानानं स्तिमित होतो. त्याचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे... कुठे शहाद्याचे आदिवासी... आणि कुठे ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक. ‘मुसाफिर’ म्हणजे... दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणार्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर... तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत... थक्क करणारं लिखाण