'वर्तमानपत्रातल्या एका साध्या बातमीतले मंत्र्यांचे आवाहन हेच आव्हान समजून एका हाडाच्या उद्योजकाने दूध पिशवीत भरण्याचे यंत्र तयार केले आणि बघता बघता बाजारपेठेचे रूप पालटवण्याची किमया करून दाखवली. अॅल्युमिनियमची शटर्स बनवण्यापासून सुरू झालेला साधा व्यवसाय रमेश जोशी नावाच्या एका कल्पक, जिद्दी उद्योजकाने नावारूपाला आणला. पॅकेजिंगचे नवे तंत्र तर त्याने भारतात सर्वदूर पोहोचवलेच, पण नायक्रोम हा ब्रॅण्ड जागतिक पातळीवरही सुप्रतिष्ठित केला. त्या लघुउद्योजकाची, त्याच्या कर्तृत्वाची, त्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची, त्याच्या वाटेतल्या खाचखळग्यांची आणि त्याने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची, अनेक तरुणांना प्रेरणा देऊ शकेल अशी ही आत्मकथा.
Thanks for subscribing!
This email has been registered!