पुस्तकाबद्दलची माहिती: एमपीएससी परीक्षेतील मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. पीएसआय आणि सीडीपीओ परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, मानव संसाधन अभ्यासकांना, औद्योगिक तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी व उद्योजकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. मानव संसाधन विभागाची सुरवात आणि विकास, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामधील दुवा म्हणून मानव संसाधन (एचआर) विभागाने कसे कार्य करायला हवे, या संदर्भातील कायदेशीर तरतुदी, इ. विविध विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर मानवी हक्क कोणते, त्यांचे पालन होत असल्याची खातरजमा कशी करतात, याही विषयावर या पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.औद्योगिक क्षेत्रातील निवडक सत्य व कल्पित केस स्टडीज, मुलाखतीची तयारी आणि सरावाचे प्रश्न ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
लेखक डॉ. नितीन देशपांडे यांच्याबद्दल
लेखक मानव संसाधन विषयातील तज्ज्ञ असून अनेक वर्षे औद्योगिक संस्थांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावर त्यांनी काम केले आहे. सध्या ते औद्योगिक सल्लागार म्हणून कार्यरत असतात. आपल्या दीर्घानुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ते प्रशिक्षक म्हणून सहभागी होतात.