जागतिक चित्रपटाच्या विश्वात
अतिशय मानाने घेतलं जाणारं एक नाव म्हणजे
सत्यजित राय. आपल्या अभिजात शैलीने
भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर
एक वेगळी ओळख मिळवून देणारा हा महान चित्रकर्मी.
अशा या महान व्यक्तीचं बालपण नेमकं कसं गेल,
त्यांच्या आसपासचं वातावरण कसं होतं, कलेचा,
साहित्याचा वारसा त्यांना कुठून मिळाला.
त्याची बिजं त्यांच्या बालपणात कुठे रुजली होती
अशा काही बाबींविषयी अनेकांना कुतूहल असू शकतं.
वाचकांचं हे कुतूहल शमवणारं
‘जखोन छोटो छिलाम’ हे चरित्रात्मक पुस्तक
स्वत: राय यांनीच बंगाली भाषेत लिहिलं आहे.
त्याचं हे मराठी भाषांतर...
Thanks for subscribing!
This email has been registered!