‘गरिबी’चा विचार अर्थशास्त्रीय नसून तसा तो समाजशास्त्रीय देखील आहे. गरिबी ही सापेक्ष संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या निर्माण होणार्या गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती ही ज्याप्रमाणे वेगळी असते त्याचप्रमाणे गरिबी ही संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलणारी असते. गरजा निर्माण होणे व त्या सतत पूर्ण करीत जाणे ही मानवी जीवनातील साखळी आहे. समाधानी आयुष्यासाठी ही साखळी तुटणे आवश्यक असते; पण जर व्यक्तीची ही साखळी आजन्म सुरूच राहिली तर तिच्या गरजा कधीही संपणार नाहीत. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील गरिबी जाणार नाही