दहाव्या शतकापासून भारतात देशी भाषांतील साहित्यनिर्मितीला प्रारंभ झाला. संतांनी संस्कृत भाषेची कोंडी फोडून लोकभाषांद्वारे धर्मप्रवर्तन केले. कीर्तन, भजने, पदे, लोकगीतं, भारूडं इत्यादींमधून ईश्वरसन्मुख होता येते हे सिद्ध करून दाखवले. समाजातील तळागाळातल्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून तसेच समकालीन वास्तव व समाजरचना लक्षात घेऊन सांस्कृतिक प्रबोधनाचे, सामाजिक विकासाचे कार्य केले.
प्रस्तुत पुस्तकात संतांचा धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, वर्ग अशी संकुचित द़ृष्टी न बाळगता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, पुरंदरदास, बसवेश्वर, वेमना, तिरुवल्लुवर, कंबन, शंकरदेव, गुरु नानक अशा संतांच्या महान कार्याचा परिचय करून दिला आहे.
आधुनिक काळात भौतिक प्रगती होऊनही माणूस नैराश्य, नैतिक र्हास, एकाकीपणा यांनी ग्रासलेला आहे. यावर संतविचारातील सदाचार, सद्वर्तन, सात्त्विकता, सद्गुणांचा अंगीकार या मूल्यांचा स्वीकार केला तर वर्तमानातील संभ्रमित मानवी मनाला मोठा आधार मिळेल.
प्रस्तुत पुस्तकात संतांचा धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, वर्ग अशी संकुचित दृष्टी न बागळता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, पुरंदरदास, बसवेश्वर, वेमना, तिरुवल्लुवर, कंबन, शंकरदेव, गुरुनानक अशा संतांच्या महान कार्याचा परिचय करून दिला आहे.
विविध प्रांतांतील भारतीय संतांचे चरित्र आणि वाङ्मय अभ्यासकास, रसिकास आणि भक्तजनांस भावेल असे हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक!