गेल्या कित्तेक वर्षांत, अनेक भाषांमध्ये लोकमान्य टिळकांवर विपुल साहित्य लिहिले गेले. त्यापैकी काही साहित्य तर इतके लक्षवेधी आणि तपशीलवार आहे की, लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य समजून घेताना, प्रत्येक वेळी आपली मान अभिमानाने उंचावते. सदर पुस्तकात टिळकांसारख्या एका लढवय्याचे चरित्र खोलात जाऊन उलगड्ल्याने एखाद्या अत्यंत आवडत्या कथेसारख्या या लढवय्याच्या लढ्याच्या सुरस कथा वाचकाला निश्चित मंत्रमुग्ध करतात. त्याने वाचकाचा ऊर गर्वाने नक्कीच भरून येईल, यात शंका नाही