इम्रान खान
प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान!
इम्रान खान हा क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं पाकिस्तानला अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले. कर्णधार म्हणून तर इम्रान कदाचित आजवरचा सगळ्यात प्रभावशाली नेता ठरावा. त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्ताननं अत्यंत अनपेक्षितरीत्या विश्वचषक जिंकला.
हाच इम्रान आता राजकारणात 22 वर्षं झुंज देऊन पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आहे. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलेलं असताना नेहमीच्याच जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं इम्रान राजकारणातही आपली खेळी खेळण्याच्या बेतात आहे. अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!