आवडता हिंदी चित्रपट म्हणल्यावर आजही अनेकांचे उत्तर, चुपके चुपके, गोलमाल, आनंद, खुबसुरत , सत्यकाम, नमक हराम, अनुपमा, अनाडी यातला एखादा चित्रपट तरी असतेच आणि तेच यश आहे हृषीकेश मुखर्जी या असामान्य दिग्दर्शकाचे!
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित, पद्मविभूषण हृषीकेश मुखर्जी यांना 7 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर मिळालेच पण अनुराधा हा त्यांच्या चित्रपटाला बर्लिन फेस्टिव्हलच्या गोल्डन बेअरचे नामांकन देखील मिळाले होते.
राज कपूर पासून ते अनिल कपूरपर्यन्त , लीला चिटणीस ते जुही चावलापर्यन्त , अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना या अशा सगळ्या दिग्गजांनी त्यांच्या चित्रपटात काम केले आहे. हृषीदा उत्तम संकलक देखील होते. हृषीदांचे चित्रपट हे सामान्य रसिकांना जेव्हढे आवडायचे तेव्हढेच ते समीक्षकांना देखील आवडायचे. एकच वेळी क्लास आणि मास सांभाळणाऱ्या या दिग्दर्शकाच्या अनेक चित्रपटात पुढचे काही चित्रपट दडलेले असायचे. त्यांच्या चित्रपटात दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कारण, विचार असायचा. त्यांच्या चित्रपटांचा तौलनिक अभ्यास करून जय अर्जुन सिंग यांनी हृषीदांवर 'The World of Hrishikesh Mukherjee' हे सुंदर पुस्तक लिहिले त्याचाच अनुवाद इंद्रायणी साहित्यने 'हृषीकेश मुखर्जी : बेमिसाल चित्रपटांची खुबसुरत दुनिया ' या नावाने आणला आहे.
हा अनुवाद करताना हृषीदांचे चित्रपट मला नव्याने कळले. त्यातील सामाजिक भान नव्याने उमगले. या महान दिग्दर्शकाची आज जन्मशताब्दी आहे.
- अनुवादक मानसी होळेहुन्नूर
Thanks for subscribing!
This email has been registered!