गांधींचं जीवन आणि त्यांचे आदर्श जगभरातील लोकांना प्रेरणादायी ठरले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतीमुळेच मोहनदास करमचंद गांधी लोकांना मोहात पाडतात. एका खट्याळ, मौजमजा करायला आवडणार्या मुलामध्ये हळूहळू परिवर्तन होत होत तो महात्मापदापर्यंत कसा पोहोचला, याचा अत्यंत आत्मीयतेनं केलेला अभ्यास म्हणजेच प्रस्तुत पुस्तक गांधी - सचित्र जीवनदर्शन. क्रमसुसंगत मजकूर आणि सोबतच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विलक्षण गुंतागुंत, त्यांचं यशापयश, समकालीनांसोबतचं जवळचं नातं आणि त्याच वेळेस स्वतःच्या कुटुंबीयांसोबत अवघडलेले नातेसंबंध या सगळ्या गोष्टी वाचकांसमोर उलगडतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!