दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्य्वर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक - दादांची हीच प्रतिमा जनमाणसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं? त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कोण होती? दादांशी त्यांचे नातेसंबंध कसे होते? माणूस म्हणून दादा कसे होते अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतील. कारण, या पुस्तकातून दादा स्वतः त्यांच्याच शब्दांत आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगत आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!