मी आपल्याला सांगतो, कोणी कितीही दुबळा असला तरी एक पाऊल पुढे टाकण्याची ताकद सर्वांमध्ये असते. हजार मैल चालण्याची नसेल, हिमालय चढण्याची नसेल, पण एक पाऊल उचलण्याचं सामथ्र्य प्रत्येकामध्ये असतं. थोडासा धीर एकवटला तर आपण एक पाऊल नक्कीच टाकू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो, जो एक पाऊल उचलू शकतो तो हिमालय चढू शकतो; जो एक पाऊल उचलू शकतो तो हजारो मैल चालू शकतो. कारण या जगात कोणीही कधीही एका पावलाहून अधिक चालूच शकत नाही. नेहमी एकच पाऊल चाललं जातं... एक पाऊल अगदी पुरेसं आहे. कारण एकाच वेळी दोन पावलं कोणीच टाकू शकत नाही. एकच पाऊल टाकण्याचा धीर करण्याची गोष्ट आहे आणि जो जिवंत आहे त्याच्यामध्ये एवढं सामथ्र्य नक्कीच आहे.