‘देखण्या बांधणीतली एक लोभसवाणी कादंबरी... जितकी कल्पक तितकीच प्रेमाने ओथंबलेली!’’ – स्कॉट ट्यूरो पारंपरिक कक्षा छेदून निर्माण झालेली ही विलोभनीय प्रेमकथा आहे, ग्रंथपाल हेन्री डी’टॅम्बल आणि चित्रकार क्लेयर अॅब्शायर ह्यांची. काळाच्या लहरीनुसार आयुष्य कंठणारा हेन्री आणि त्याच्या विचित्र अस्तित्वाशी शक्य तितक्या सहजतेने जुळवून घेत, स्वत:चं (तुलनेने) सामान्य आयुष्य कंठणऱ्या क्लेयर ह्यांचं प्रेम, काळाच्या कैक परीक्षा सर करत दृढ होत जातं. पण तसं करत जाताना, त्यांच्या नियतीचा कसा कस लागतो आणि प्रेम त्यांना कसं तारून नेतं, हे अनुभवण्यासाठी सदर कादंबरी वाचायलाच पाहिजे!