दुसरे महायुद्ध साऱ्या जगाची उलथापालथ करणारे ठरले. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाचीच नव्हे तर, तर अनेक देशांची अंतर्गत परिस्थिती या महायुद्धामुळे बदलली. या महायुद्धाचा विस्तृत पट लेखक वि. स. वाळिंबे यांनी या पुस्तकात मांडला आहे.
१९३९ मध्ये या युद्धाच्या ज्वाळा भडकल्या. जर्मनी, इंग्लंड, रशिया, बेल्जीयम, डंकर्क, फ्रान्स, युगोस्लाव्हिया, ग्रीस आदी देशांचे डावपेच, सैन्याची परिस्थिती, देशांतर्गत राजकारण, समाजजीवन आदींचा लेखाजोखा पुस्तकात वाचायला मिळते. युद्धाचे लोन आफ्रिका खंडातही पसरले होते.
नंतर जपानही मैदानात आले. ब्रिटनच्या अधिपत्याखालील भारतालाही सहभागी होणे भाग पडले. अखेर हुकुमशाहीचा पाडाव आणि ब्रिटनची जीत नव्या जगाची नांदी देणारे ठरले. हा थरारक इतिहास लेखनातून जिवंत होतो.