देशाची वेस ओलांडलेल्या विलक्षण माणसांच्या या गोष्टी. नव्या अनोळखी जगात रूळताना होणारे मनोसंघर्ष या कथा मांडतात. वर्गमैत्रिणीला भेटल्यावर खार्टुममधल्या जगण्याची वेदनादायी स्मृती उजळणारी तरुणी, एका श्रीमंत सुदामी विद्यार्थ्याचं स्कॅटिश माणसाशी झालेलं विचित्र मैत्र, आपल्या लाडक्या लेखकाशी जुळलेलं एका महिलेचं नवं नातं, मांडता मांडता लेखिका स्थानिक अस्मिता आणि वैश्विक सभ्यतेतला अनोखा धागा जोडत जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतींचे पडसाद यात उमटतात आणि जगाच्या नकाशावरच्या अखिल मानवजातीचं प्रतिबिंब यात पहायला मिळतं.