डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन म्हणजेच सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी चळवळ आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेत परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या देशात सामाजिक लोकशाहीची स्थापना करण्याच्या दृष्टीने त्यांचा वैचारिक संघर्ष होता. बाबासाहेबांच्या वैचारिक संघर्षाचे, सामाजिक समतेच्या आंदोलनांचे एक व्यापक विचारमंथन अॅड. जयदेव गायकवाड यांनी या पुस्तकात केले आहे. या अर्थाने, समतेच्या आंदोलनातील बाबासाहेबांचा विचारपट उलगडणारे चरित्रच अॅड. गायकवाड यांनी येथे मांडले आहे.