आपल्या डोक्यात कांदेबटाटे भरलेले आहेत की
दगड भरलेले आहेत? सगळ्यांची बोलणी खाऊन
मैत्रेयीला प्रश्न पडलाय.
मैत्रेयीची आई आहे डॉक्टर.
तिच्याकडे अशा प्रश्नांची सगळी उत्तरं असतात.
मैत्रेयीच्या मते, जगात असा एकही प्रश्न नाही,
ज्याचं उत्तर आईला माहीत नाहीये.
त्यानुसार आईने सांगितलं की, ‘डोक्यात असतो तो मेंदू.’
भुताच्या सिनेमात मैत्रेयीने माणसाच्या डोक्याची कवटी
पाहिलेली होती, पण प्रत्यक्षात नाही.
‘तुला ती नंतर कधीतरी दाखवेन,’ असं आईने कबूल केलं
आणि मेंदू कुठे असतो, कसा दिसतो, कोणकोणती कामं करतो
या सगळ्याची माहिती दिली. इतकी माहिती मिळाल्यामुळे मैत्रेयीला
एकदम पाच आक्रोड खाल्ल्यावर वाटतं तसं हुशार वाटू लागलं !
Thanks for subscribing!
This email has been registered!