‘हा पावसाचा महिमा लहानपणापासून आम्ही ऐकला. या देशातल्या माणसाइतका आणखी कुणाला तो कळला असेल की नाही, मला माहीत नाही. आमचे सगळे जगणेच पावसावर अवलंबून असते. पावसाने यावे म्हणून त्याला पैसा देण्याचे आमिष दाखवायचे. बायकांनी जात्यावर ओव्या म्हणायच्या –‘पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा, पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा.’ पावसाबद्दल एवढा भक्तिभाव का, तर... काळी पिकली पाहिजे.’