सावध करणारे अस्वस्थ लेख
बघता बघता पायांखालची वाट धुक्यात हरवावी तसं जगतानाही कित्येक प्रसंगी होत असतं. 'धोक्यात हरवलेली वाट' या पुस्तकातील याच धर्तीचे २७ लेख म्हणजे सर्व वयोगटातील वाचकांच्या कुटुंबजीवनाचा आरसाच आहे. त्यात दिसणारा आपला चेहरा सुबक व आकर्षक करण्याची प्रेरणा मिळेल.
समाजात वावरताना खोलवर अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टी मनाशी रेंगाळतात. उदारीकरणानंतर मानवी जगण्यात झालेली मूल्यांची पडझड ही अधिक
नजरेत भरते. या अनुषंगानं जगण्यातल्या अस्वस्थ कोनांवर प्रकाश टाकून पुढची वाट अधिक सावध करणारे लेख ‘धोक्यात हरवणारी वाट’ या पुस्तकात आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!