रस्किन बाँड यांच्या नवीन कथांच्या या विलक्षण संग्रहात गतकाळातल्या मसुरीत घडलेल्या रोमांचक गोष्टी आहेत. त्यात ‘खून झालेला पाद्री’, ‘विवाहबाह्य संबंध ठेवणारं जोडपं’, ‘जन्मतः दुष्ट असलेला मुलगा’, ‘बॉक्स बेडमधलं प्रेत’, ‘टपालातून आलेल्या विषाचं गूढ’, ‘कोन्यॅकमधून केलेला विषप्रयोग’, ‘रहस्यमय काळा कुत्रा’ आणि ‘दर्यागंजचा खुनी लेखक’ अशा चटकदार कथा ते सादर करतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!