सर जॉर्ज आणि लेडी स्टब्ज् यांनी आयोजित केलेल्या खेडेगावातल्या समारंभात खुनाचं नाट्य उभं करणारा एक खेळ आयोजित करताना सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका अॅरिअॅने ऑलिव्हर भीतीच्या एका जाणिवेने थरारून उठते. कदाचित तिला अंत:प्रेरणा म्हणता येईल; पण ती भावना काय होती ते ती समजावून सांगू शकत नाही आणि तिच्यापासून सुटकाही करून घेऊ शकत नाही.
अगतिकतेने ती तिच्या जुन्या मित्राला- हर्क्युल पायरोला- पाचारण करते. आणि तिची अंत:प्रेरणा सत्य ठरते. त्या लटक्या खुनात बळी जाणारी व्यक्तिरेखा खरोखरच्याच खुनाला सामोरी जात असते... फास तिच्या गळ्याभोवती घट्ट आवळला जातो. पण हा थोर डिटेक्टिव्ह पहिल्यांदाच शोधून काढतो की खूनसत्रात, मग ते वास्तवातलं असो की खोटं, प्रत्येक जणच त्यात कुठलीतरी भूमिका निभावत असतो.
‘अतिशय बुद्धिमानपणे केलेली गूढ कोड्यांची निर्मिती.’
Thanks for subscribing!
This email has been registered!