"‘डव्हाळं’ हा श्री. बा. ग. केसकर यांच्या सोळा कथांचा संग्रह. या संग्रहात श्री. केसकर यांनी ग्रामीण जीवन आणि त्या जीवनातील समस्या, गुंतागुंत व मूल्यसंघर्ष यांचं विश्लेषण प्रत्ययकारी केलं आहे. आजच्या ग्रामीण जीवनात सुनी जीवनमूल्ये, अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरा काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु त्याऐवजी नवी जीवनदृष्टी आणि नव्या यंत्रयुगाच्या प्रखर वास्तवाचं भान मात्र आवश्यक त्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे एकीकडे दारिद्र्यात राहूनही कष्ट करणाऱ्या ग्रामीण स्त्रीविषयी सहानुभूती वाटते, तर दुसरीकडे अन्याय, शोषण करणाऱ्या समाजातल्या एका समूहाविषयी विलक्षण संताप निर्माण होतो. नवी पिढी मात्र संवेदनशून्यपणे, वास्तवाकडे मुर्दाडपणे (की अगतिकतेने?) पाहत जगत आहे. ही अनकलनीय शोकांतिका वाचकाला अंतर्मुख करते. "